| पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी शिर्डीमध्ये होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या समोरच भाषणातून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवर सुप्रिया सुळे आणि काही नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केले असून अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना एकाच मंचावर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे देखील उपस्थित होते. मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली तेव्हा अजित दादा व्यासपीठावर होते. त्यांनी बोलायला पाहिजे होते. मराठी माणूस हा प्रतिउत्तर देणारा माणूस असतो, असे रोहित पवार यांनी म्हटले. अजित दादांनी पूर्वीच्या भाषणात शरद पवार यांचे गुणगान गायलेले आहेत. मात्र अशा वेळी अजित दादा शांत बसत असतील तर आम्हाला हे अवघड वाटते. योग्य वाटत नाही, असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी म्हटले आहे.