Wednesday, April 17, 2024

बारामतीत शरद पवारांच्या बाजूने बोलणाऱ्यांना नोकरीतून काढले जातय…रोहित पवारांचा गंभीर खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत धक्कादायक दावा केला आहे. शरद पवार यांच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरुन काढण्याचा आणि दादागिरी करण्याचा प्रकार केला जात असल्याचा मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar
@RRPSpeaks
अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग #मलिदा_गँग करतेय.. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या #मलिदा_गँग नेही लक्षात ठेवावं!

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles