राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निधीवाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे.
अर्थमंत्री अजित पवार आहेत. पण, रूग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीसांनी दिल्यात. हा अजित पवारांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार आहे. मात्र, तो योग्य नाही, असा हल्लाबोल रोहित पवारांनी फडणवीसांवर केला आहे.
एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर रोहित पवार म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही.”