Saturday, May 18, 2024

‘तू जर आजोबाबरोबर नसता राहिला तर आम्ही… मुलांनी रोहित पवारांना स्पष्टच सांगितलं होतं…

‘तू जर आजोबाबरोबर नसता राहिला तर आम्ही तुझ्याशी बोललो नसतो.’ असा दम आमदार रोहित पवार यांना त्यांच्या मुलांनी दिला होता. इंदापूरमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत भाषण करताना रोहित पवार यांनी हा किस्सा सांगितला.

रोहित पवार यांनी इंदापूरच्या सभेत सांगितले की, ‘आमचे आजोबा शरद पवार यांनी 60 वर्षे जो विचार जपला. तो ते आजही जपत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदललेली नाही. जेव्हा ही कुटुंब फुटल्याची घटना घडली तेव्हा माझ्या लहान मुलांनी मला विचारले होते की, तू कुणाबरोबर आहेस. मी सांगितले मी आजोबांबरोबर आहे. त्यावर ते म्हणाले होते की, तू जर आजोबा बरोबर गेला नसता तर आम्ही तुझ्याशी बोललो नसतो.’तसंच, ‘आता आम्ही लहान आहोत. ज्या वेळेस आम्ही शिकून मोठे झालो असतो. त्यावेळेस तुला सांगितलं असतं की आता तू तुझं वेगळं घर बघ. याची भीती अशी आहे की 15 वर्षांनी माझी मुलं देखील मला म्हटले असते की जा आता तू गेट आउट…यातून मला युक्तिवाद राहिला नसता. कारण मी माझ्या आजोबांबरोबर असं वागलो असतो तर माझी मुलं माझ्यासोबत अशी वागली असती.’ असे रोहित पवार यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles