Monday, July 22, 2024

खा.निलेश लंकेंची गुंड गजा मारणेशी भेट…आ.रोहित पवारांनी मागितली माफी….

रोहित पवार म्हणाले, आहिल्यानगरचा आमदार म्हणून आणि निलेश भाऊंच्या प्रचारात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून सांगतो की, जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी देखील माफी मागितली आहे. त्यांना त्याच्याबाबत माहिती नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा. कारण त्यांना लोक फॉलो करत असतात. जसं निलेश भाऊंनी माफी तसंच मी सुद्धा माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेला. कृपा करुन याच्यावर कोणही राजकारण करु, अशी विनंती आहे.

खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला. त्यामुळे निलेश लंकेंवर चौफेर टीका सुरु झालीये. लोकसभा निवडणुकीत गजा मारणेने मदत केली, त्याचे आभार मानायला ही भेट होती का? अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles