आमदार रोहित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा त्यांनी स्वत:च स्थगित केली आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी याबाबत घोषणा केली. याचबरोबर असा निर्णय का घेतला याचे कारणही स्पष्ट केले.
रोहित पवार म्हणाले, ”आज महाराष्ट्र पेटला आहे, महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे. आज विविध ठिकाणी तरूण आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय तीच मूलं जर आत्महत्या करत असतील तर मग अशा परिस्थितीत आपण यात्रा पुढे कशी घेऊन जाऊ शकतो.”
मी माझी भूमिका इथे सांगितलेली आहे. मी स्वत: मराठा आहे. माझी यात्री मी कशामुळे स्थगित करत आहे, हे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल मी घाबरलो का? जर या महाराष्ट्रात युवा आत्महत्या करत असेल, तर होय मी घाबरलो. हा जो स्वाभिमानी, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. तो जर अशांत असेल तर होय मी घाबरलो. आज जर युवकांना संधी मिळत नसेल, त्यामुळे जर युवक वेगळा कोणता तरी निर्णय घेत असतील, तर होय मी घाबरलो.” असं रोहित पवारांनी सांगितलं.