Sunday, December 8, 2024

जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर,मै हु डॉन गाण्यावर थिरकले रोहित पवार

जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर , दहिहंडी कार्यक्रमात मै हु डॉन गाण्यावर थिरकले आमदार रोहित पवार

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )

जामखेड – राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत.
दहीहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकले तर याच वेळी दहिहंडी कार्यक्रमात मै हु डॉन गाण्यावर थिरकले रोहित पवार बाळ गोपाळ व कार्यकर्त्यांसह मनसोक्त थिरकले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. फलटण येथील जय हनुमान पथकाने पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक जिंकले.

कर्जत जामखेड मध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये १ सप्टेंबरला दादा पाटील महाविद्यालयात तर जामखेडमध्ये काल २ सप्टेंबरला नागेश विद्यालयात दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात आमदार रोहित भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांच्या हातात बॅनर होते याच वेळी मै हु डॉन गाण्यावर आमदार रोहित पवार बाळ गोपाळ व कार्यकर्त्यांसह मनसोक्त थिरकले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ही दहीहंडी स्पर्धा कर्जत आणि जामखेडमध्ये झाली कर्जत मध्ये झालेल्या दहीहंडी स्पर्धेला मराठी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची खास उपस्थिती राहणार होती तर जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि ऋता दुर्गुळे ह्या उपस्थित होत्या.

कर्जत-जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. फलटण येथील जय हनुमान पथकाने पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक जिंकले.

रोहित पवारांनी भान ठेवले पाहिजे : मधुकर राळेभात
दहिहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री रोहित पवार असे बॅनर झळकले. मै हूँ डॉन या गाण्यावर आमदार रोहित पवार स्वतः थिरकले होते . यावेळी प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले. आता पक्ष फुटला तरी या पक्षासाठी निष्ठेने योगदान देणाऱ्यांना सोडून अवघ्या ५ वर्षांपूर्वी अपघाताने आमदार झालेल्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत. आधी त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून परत निवडून येण्याचे पहावे. त्यांनी या गोष्टीचे भान ठेवलं पाहिजे, असा टोला प्रा. राळेभात यांनी लगावला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles