नगर तालुक्यात शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी
जिल्हा पोलीस प्रमुख यांची व्यापाऱ्यांसमवेत समवेत आ.संग्राम जगताप यांनी भेट घेत कारवाईची केली मागणी
अहिल्यानगर : नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी, विजय वालचंद गांधी बाबुर्डी येथे सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोजपणे पाल टाकण्याचे काम केले जाते. त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, जयेश पोखरणा, पिंटू कटारिया, कमलेश भंडारी, दिनेश संकलेचा, रोहन बोरा, संदीप बोरा, गणेश बुरा, नितीन शिंगवी, रितेश सोनीमडलेचा, सचिन छाजेड, मनीष लोढा, ईश्वर बोरा, दिनेश संकलेचा, भरत गुरुनानी, पराग मानधना आदीसह व्यापरी मोठ्या संख्येने उपस्थित होता
शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील गावांमध्ये विशिष्ट समाजाकडून पाल टाकून ताबेमारी केली जाते तसेच खंडणी मागत दमबाजी केली जाते अशा लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून यावेळी कारवाईची मागणी केली तसेच अशा प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय-हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केले जाईल असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले
यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले






