Tuesday, April 23, 2024

नगर मनपा हद्दीतील रस्त्यांच्या विकास कामांसाठी १५० कोटींचा निधी मंजूर,आ.संग्राम जगताप

नगर : नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या 308 कोटी रुपयांच्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे. नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया आ.संग्राम जगताप यांनी दिली आहे.
आ.संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने 308 कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुशंगाने आ.जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. नगर शहरातील डीपी रस्ते प्राधान्यक्रमाने होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंत्रालय पातळीवर कायम संपर्कात राहून नगर शहरातील भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले. नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांचा विकास निधी अभावी रखडलेला आहे. परिणामी शहराचा विस्तार, विकासात अडथळे निर्माण होतात. चांगले रस्ते हे शहराची जीवनवाहिनी असतात. दळणवळण प्रशस्त झाले तर विकास आराखड्याची नियोजनपूर्वक अंमलबजावणी शक्य होते. नवीन वसाहती निर्माण होतात. मुख्य रस्त्यांभोवती बाजारपेठ उभी राहते. पर्यायाने शहराच्या अर्थकारणाला चालना मिळते. याच गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करीत आ.जगताप यांनी राज्य शासनाकडून डीपी रस्त्यांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे.

नगर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत सतत ओरड होते. परंतु, प्रश्न सोडवण्यासाठी चिकाटी आणि पाठपुरावा हवा असतो. मनपाच्या तिजोरीत कायम खडखडाट असतो. त्यामुळे डीपी रस्त्यांची कामे करायची तर शासनाच्या निधीशिवाय पर्याय नाही. तो मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून शासन दरबारी प्रस्ताव मंजूरीसाठी कायम दक्ष रहावे लागते. आ.जगताप यांनी हेच काम अतिशय प्रभावीपणे करून शहराच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त केला आहे.

आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक कायम ठेवली आहे. मधल्या काळात झालेल्या पक्षांतर्गत राजकारणावेळीही त्यांनी अजितदादांबरोबरच राहणे महत्वाचे मानले. यात राजकारणापेक्षा शहर विकासाचे दीर्घकालीन उद्दिष्ट होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपले विश्वासू असलेल्या आ.जगताप यांना विकासासाठी सहकार्य करीत नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या मंजूरीसाठी विशेष प्रयत्न केले.
शहरातील डीपी रस्त्यासाठी मिळालेला निधी – प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील माऊली संकुल ते गंगा उद्यान ते छत्रपती संभाजीनगर रोड कलेक्टर ऑफिस पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासहित रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे १५ कोटी रुपये, प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्व मंगल कार्यालय मनोज साठे घर ते भिंगारवाला रस्त्याचे रुंदीकरणासह रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे 3 कोटी ६६ लक्ष रुपये, केडगाव लिंक रोड ते जे एल पी रेसिडेन्सी ते पूना रोडपर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे 6 कोटी रुपये, प्रभाग 14 मधील झिंजुर्डे घर ते ज्येष्ठ नागरिक भवन ते सीना नदीपर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे १२ कोटी ३४ लाख रुपये, सावेडी अष्टविनायक अपार्टमेंट ते टेलीफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते सिटी प्राईड हॉटेल ते तपोवन रोड बालाजी कॉलनी नाला राजनंदनी हॉटेल सोडून रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे ७ कोटी ६८ लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक ३ मुकुंदनगर सीआयव्ही कॉलनी रस्ता रुंदीकरणासहित विकसित करणे कामासाठी सुमारे ५ कोटी 16 लक्ष रुपये, भिंगार नाला विकसित करणे, मनपा हद्दीतील कामासाठी सुमारे 16 कोटी 44 लक्ष रुपये, भवानीनगर इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते औसरकार मळा ते साळुंखे मळा , बुरूडगाव रोड विकसित करणे कामासाठी सुमारे १३ कोटी 50 लाख रुपये मंजूर, बुरूडगाव रोड नक्षत्र लॉन ते वाकोडी रोड या रस्त्याला जोडणारा रस्ता सी ए भवन ते वाकोडी रोड समर्थनगर रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे २ कोटी ४० लक्ष मंजूर, माळीवाडा वेस ते पंचपीर चावडी ते माणिक चौक, भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक ते पेशवाई शॉप रस्ता विकसित करणे या कामासाठी सुमारे १० कोटी 67 लक्ष रुपये मंजूर, पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौक लाल टाकी ते न्यू आर्ट्स कॉलेज पर्यंत रस्ता विकसित करणे सुमारे १५ कोटी 74 लक्ष रुपये मंजूर, नगर वाचनालय ते गांधी मैदान आनंदी बाजार ते गाडगीळ पटांगण ते अमरधाम रोड पर्यंत रस्ता विकसित कामासाठी सुमारे ५ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर, प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव सुरेश वाडमोडे घर ते आढाव घर ते विलास वाटमोडे दुकान ते समृद्धी पार्क पर्यंतचा रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे ४ कोटी 91 लक्ष रुपये मंजूर, दिल्लीगेट ते बागरोजा हडको चौक ते नेप्ती नाका चौक रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे ४ कोटी ५ लक्ष रुपये मंजूर, जी,पी, ए चौक धरती चौक ते मार्केट यार्ड चौक कल्याण रोड ते डेअरी रोड पर्यंत रस्ता विकसित करणे काजी वकील ते कल्याण रोड वगळून विकसित कामासाठी ६ कोटी ३९ लक्ष रुपये मंजूर, प्रभाग क्रमांक ३ मधील गोविंदपुरा नाका ते गोविंदपुरा पोलीस चौकी पर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे २ कोटी 58 लक्ष रुपये मंजूर, प्रभाग क्रमांक २ तपोवन रोड ज्ञानेश्वरी ब्युटी पार्लर ते राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन पर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे ३ कोटी 23 लक्ष रुपये मंजूर, प्रभाग क्रमांक २ श्यामसुंदर पॅलेस ते हिवाळे घर ते तवले वाडा हिम्मतनगर पर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे ३ कोटी ११ लक्ष रुपये मंजूर, सारसनगर बाळू इकडे पिठाची गिरणी ते साईनगर ते छत्रपती नगर पर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे २ कोटी 38 लक्ष रुपये मंजूर, यशोदा नगर जरीवाला बिल्डिंग ते चंचल निवास स्नेहल ट्रेडर्स ते सपकाळ हॉस्पिटल ते किंग कॉर्नर पर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे ३ कोटी 43 लक्ष रुपये मंजूर, प्रोफेसर कॉलनी चिन्मय शॉप ते अवतार मिनी मार्केट ते संत निरंकारी भवन ते गंगा उद्यान पर्यंत रस्ता विकसित करणे कामासाठी सुमारे ५ कोटी ९९ लक्ष रुपये मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यात एकूण १५० कोटी रुपये मंजूर झाली असून ही कामे तातडीने सुरु होणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles