राजकारणात कोणत्या वेळेला कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुम्हाला सत्तेत राहण्याची आणि मंत्रिपदाची संधी फक्त भाजपच देऊ शकते, असे म्हणत माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.
बोल्हेगावमधील राजे छत्रपती संभाजीनगर येथील स्व. विशालभाऊ वाकळे पाटील उद्यानात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, निखिल वारे, मनोज कोतकर आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, की कोणाला कोणत्या पक्षात जावे लागेल याची खात्री नाही. त्यामुळे येथून पुढे पक्षाचा उल्लेख करू नका. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो. महापालिकेत भाजपचे केवळ १४ नगरसेवक निवडून आले, तरी महापौर आणि उपमहापौर भाजपचे झाले. पुढे आम्ही राष्ट्रवादीला मदत करत त्यांची सावड फेडली. आजच्या तरुण राजकारण्यांनी राजकारणापलिकडे जाऊन कामे केली पाहिजेत.
कॉन्ट्रॅक्टर