Saturday, September 14, 2024

नगर शहरात विकासाची गंगा आ. संग्राम जगताप म्हणतात… चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल

आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल – आ. संग्राम जगताप

नगर : शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी साडेतीनशे कोटीचा विकास आराखडा तयार केला. त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहे, याचबरोबर नगरसेवकांच्या मागणीनुसार 44 कोटी रुपये मिळाले आहे, या माध्यमातून शहरांमधील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामाचे नारळ फोडण्याचा आग्रह धरत आहे, माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडली जातील व चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढले जाते. गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत नवीन रस्ता निर्माण केला. मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजी नगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याची प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेविका शोभा बोरकर, अशोक गायकवाड, निखिल वारे, अजिंक्य बोरकर , बाळासाहेब पवार, अमोल गाडे, संजय चोपडा, काकासाहेब शेळके, मनोज दुल्लम, उदय कराळे, करण कराळे, एडवोकेट येव्होन मकासरे, सतीश बारस्कर, डॉक्टर सतीश सोनवणे, डॉक्टर प्रशांत पठारे, रमेश खिलारी, सतीश गुंफेकर, संजय खामकर ,विजय मगर, भरत पवार, बबन काळे, विशाल शिंदे ,जयकुमार खूपचंदानी, बाळासाहेब गायकवाड, सुशील बजाज, जयराम काबरा, सनी अहुजा ,डॉक्टर वाळेकर, डॉक्टर भोईटे ,महादेव काकडे ,जितू खंडेलवाल, जितू गंभीर, सुशील थोरात, सुबा खंडेलवाल, अशोक गोपलानी, मयूर कुलथे, सुमित महाजन ,मुकुल गंधे ,योगेश सोनवणे, बाबासाहेब भोंगे, सुमित कुलकर्णी ,आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
अजिंक्य बोरकर म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरांमध्ये रस्त्याची जाळे निर्माण करण्याचे काम सुरू आहेत शहरामध्ये विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून पुढील अनेक वर्षांचा विचार करून नियोजनबद्ध व दर्जेदार विकास कामे सुरू आहेत गंगा उद्यान परिसरामध्ये मुझिकल फाउंटनचे काम सुरू होणारअसून दुसरे स्पोर्ट कॉम्प्लेक्स देखील निर्माण होणार आहे, या माध्यमातून युवकांना खेळाची मैदानी निर्माण होवून चांगले खेळाडू तयार होतील , पर्यटनाच्या दृष्टीने देखील शहरात विकासाची कामे सुरु आहे

शहर वासीयांच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचे ठिकठिकाणी स्वागत
माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी नागरिकांनी आ. संग्राम जगताप यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, अनेक दिवसांपासून माऊली संकुल चौक रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्गी लावल्या मुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles