Monday, June 23, 2025

नगर शहरात विकासाची कामे केल्यामुळे विस्तारीकरणाला चालना – आ.संग्राम जगताप

नागापूर येथील प. पू. वाल्हेराज बाबा बिडकर मार्ग नामकरण सोहळा व आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून ख्रिश्चन समाज दफनभूमी संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ संपन्न

शहरातील उपनगरांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे केल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली – आ.संग्राम जगताप

नगर : सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाचे चांगले काम उभे राहत आहे, गेल्या १० वर्षांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्याने विकासाची कामे पूर्ण होत आहे पर्यटन, क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नगरकरांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहे, शहराच्या उपनगरांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे केल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे, नागापूर बोल्हेगाव परिसराला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे येथील औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. प.पू. वाल्हेराज बाबा बिडकर यांच्या आशीर्वादाने हा भाग पवित्र झाला आहे त्यांचे धार्मिकतेचे कार्य महान आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
नागापूर येथील प. पू. वाल्हेराज बाबा बिडकर मार्ग नामकरण सोहळा व आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून ख्रिश्चन समाज दफनभूमी संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक राजेश कातोरे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, हनुमंत कातोरे, माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे, साहेबराव सप्रे, सुरेश बनसोडे, लहानु पाटील भोर, नवनाथ कातोरे, भालचंद भाकरे, शाम महाराज बिडकर, चंदू काळे, निलेश भाकरे, विश्वास भाकरे, सुरेश भिंगारदिवे, कुसुम सिंग, राणी भाकरे, राहुल कातोरे, नरेश पवार, नवनाथ पवार, सुभाष लबडे व नागापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगरसेवक राजेश कातोरे म्हणाले की, ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता हा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावला आहे तसेच परमपूज्य वाल्हेराज बाबा बिडकर यांचे नाव नागापूर रस्त्याल देण्यात आले आहे. बोल्हेगाव नागापूर परिसरामधील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे असे ते म्हणाले.

आमदार संग्राम जगताप यांनी नागापूर बोल्हेगाव ग्रामीण भागाला विकास कामातून शहरीकरणाचे रूप प्राप्त करून दिले आहे गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत व गांधीनगर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे नियोजनबद्ध दर्जेदार व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. विकास कामाबरोबरच या परिसरामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाचे काम उभे करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करून नागापूर बोल्हेगावला हरित उपनगर निर्माण करू असे मत माजी सभापती कुमारसिंह वाकळे त्यांनी केले,

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles