Saturday, December 9, 2023

सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी आहे, त्यांना संपवायला हवं होतं… शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य

शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोडीवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “गुणरत्न सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी झाली. त्यांना संपवायला हवं होतं”, असं मत संजय गायकवाडांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी मराठा तरुणांनी सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेवर माध्यमांशी बोलत होते.

गायकवाड म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठ्यांच्या तोंडातील आरक्षण हिसकवालं गेलं. त्यांनी न्यायालयात प्रखरपणे मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली. यावेळी ते सुडाने पेटले होते, जसंकाय मराठा आरक्षणामुळे यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी आहे, त्यांना संपवायला हवं होतं.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d