नगर तालुक्यातील शिरढोण येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा नागरिक सत्कार संपन्न
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या यशाच्या मागे शिरढोणचे मोठे योगदान : युवा नेते अक्षय कर्डिले
अहिल्यानगर प्रतिनिधी : राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने सर्वांनी निवडून दिले व तसेच नगर तालुक्यातील काही गावांचा मतदारसंघ नसताना देखील त्यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन त्यांना विजय केले आतापर्यंतच्या त्यांच्या या यशामागे शिराढोणचे मोठे योगदान आहे आमदार शिवाजी कर्डिले हे नेहमीच आपल्या मतदारसंघासोबत तसेच नगर तालुक्यावर भरभरून प्रेम करतात त्याच अनुषंगाने नगर तालुक्यातील सर्व नागरिकांनी साहेबांच्या पाठीशी कायम उभे आहेत हिंदुत्ववादी विचाराचा जाज्वल्य व्रताचा वसा कार्यकर्त्यांच्या हाती सोपवून जनसेवेच्या माध्यमातून आपला भाजपा तळागाळात पोचवण्याचे काम केले तसेच आमदार कर्डिले यांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग आणि समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे. त्याच आदर्शावर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणं आवश्यक असून ते करत असताना हिंदुत्व आणि विकास हे समांतर नेण्याचे धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले .
हिंदुत्ववादी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आमदार पदी निवड झाल्याबद्दल व मेजर बबन शिंदे यांची इंडियन आर्मी मधून सेवानिवृत्ती झाल्याबद्दल नगर तालुक्यातील शिराढोण येथे भव्य नागरी सत्कार संपन्न यावेळी भाजप युवा नेते अक्षय कर्डिले, माजी सभापती संतोष म्हस्के, सभापती रबाजी सूळ, अनिल करंडे,अशोक शिंदे, मधुकर म्हस्के, दादाभाऊ दरेकर, सोनू दरेकर, सिद्धेश्वर वाघ, दासराव फुलारी, सुभाष फुलारी, सुभाष हिंगे, रोहिदास शिंदे,रमेश वारे, ताबासाहेब वाघ, अनिल दरेकर, शिरढोण व पंचक्रोशीतील गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन सोनू दरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शनही त्यांनीच मानले






