राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाबाबत भाष्य केलं. डॉ.श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील या बातम्यांत तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. या फक्त माध्यमांतील आणि सोशल मीडियातील बातम्या असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडेच हे पद असल्याने ते पद फडणवीसांकडेच राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेना शिंदे गटाला एकप्रकारे अमोल मिटकरी यांनी चिमटा काढला आहे. आधीच शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत, स्वत: एकनाथ शिंदे हेही नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, आपण नाराज नसून महायुतीचे केंद्रातील नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य आहे, माझा व शिवसेनेचा त्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
ज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाकडे गृहमंत्रीपद, अजितदादांच्या आमदाराने शिंदे सेनेला डिवचले….
- Advertisement -