मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रवादी कोट्यातील आणखी एक मंत्रिपद खाली ठेवल्याचे बोलले जात आहे. हे मंत्रिपद कोणत्या नेत्यासाठी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मंत्रिपद हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी अधिवेशनात जयंत पाटील यांनी ‘योग्य वेळी, योग्य निर्णय’ असं विधान केले होते.
जयंत पाटील यांच्यासाठी मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट
- Advertisement -