कर्जत येथील राष्ट्रीय कार्यकारिणी शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक खुलासे केल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात शाब्दीक युध्द सुरु झाले आहे. शरद पवार गटाचे आ.रोहित पवार यांनी वेळोवेळी अजित पवारांच्या भूमिकेविषयी टिकात्मक वक्तव्य केले आहे. आ.रोहित पवार यांना आता अजित पवार गटाचे प्रवक्ते आ.अमोल मिटकरी यांनी खोचक सवाल विचारला आहे.
खा.मिटकरी यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे…
आ. अमोल रामकृष्ण मिटकरी
@amolmitkari22
रोहित पवार अजित दादांवर आज ज्या पद्धतीने टीका करताहेत त्यांनी एकदा प्रामाणिकपणे जनतेला उत्तर द्यावं भाजपसोबत जाण्याची पहिली भुमिका YB चव्हाण सेंटरला पवार साहेबां समोर कशाला मांडली? मतदारसंघात निधी कमी पडतोय भाजपसोबत जावे लागेल हे वाक्य कोणाचे होते?आता हा तळतळाट कशासाठी?😄