Monday, June 23, 2025

आता बस्स!! मला साधी विधानपरिषद मिळाली तर सुरू झालं..पंकजा मुंडे भडकल्या

आमदार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांवरुन त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी ट्विट केलं असून त्यातून माध्यमांवर आगपाखड केली आहे. मला साधी विधानपरिषद मिळाली तर माझ्या विरोधात वातावरण सुरु झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, काही चॅनेलवर मी मानहानीचा दावा करणार आहे. अशी बातमी खात्री न करता देऊ नये साधा लोकशाहीचा संकेत आहे. आता बस्स!! मला साधी विधानपरिषद मिळाली तर सुरू झालं, मुद्द्यांचे बोला. असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोका. उगीच सनसनी करणारी बातमी देऊ नका. माझ्यावर 2014 पासून हे असेच करतात. पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र?”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles