नगर जिल्ह्याचे नामांतर होऊन त्याचे नवीन नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून ठेवण्याची घोषणा चौंडी येथील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचे नामांतर होईल अशी आशा आहे असं भाजप आमदार राम शिंदे यांनी यांनी म्हटलं आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष याकडे वेधले असल्याचे त्यांनी सांगितलं. ते नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. राज्याच्या मागील बजेटमध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदनिर्मिती करून त्याचे मुख्यालय शिर्डी करण्यात आले आहे. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर येत असताना ते नवीन महसूल प्रशासन इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत. त्यासाठी 61 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल आहे असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय.