दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी जी वैष्णव यांची भेट घेतली.
यावेळी खालील विषयांबाबत चर्चा केली :
1) पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा बदललेला मार्ग व प्रकल्पाला गती देणे
2) अहमदनगर-पुणे सरळ रेल्वे प्रकल्प.
3) नाशिकरोड रेल्वे स्टेशन सुशोभीकरण.
4) चाळीसगाव, पाचोरा रेल्वे थांबा.
5) वंदे भारत रेल्वेचा मंदावलेला वेग व स्वच्छतेचा प्रश्न.
उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना रेल्वेशी संबंधित अशा अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.