महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहे. पक्षाचे प्रतोद अजय चौधरी येथून आमदार आहेत. त्यामुळे शिवडीतून तिहेरी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उमेदवार देत राज ठाकरेंनी स्वबळाचा आवाज घट्ट केला आहे. सोबतच महायुतीच्या पर्यायावरही काट मारली आहे.
विधानसभेला मनसे स्वबळावरच…थेट भाजपच्या ताब्यातील मतदारसंघात उमेदवार जाहीर!
- Advertisement -