श्री. अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक.
मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. पण अशोक सर ह्या बाबतीत देखील अपवाद ठरले.
महाराष्ट्र भूषण सारखे राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कलाकरांना ते उमेदीत असताना मिळावेत असं मला वाटतं. अर्थात हे प्रत्येक वेळेला होतंच असं नाही पण अशोक सरांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य टप्प्यावर त्यांचा उचित सन्मान केला ह्याबद्दल राज्य सरकारचं पण मनापासून अभिनंदन.
पुन्हा एकदा अशोक सराफ सरांचे मनःपूर्वक अभिनंदन !
#महाराष्ट्रभूषण #अशोक_सराफ #मराठीकलावंत #MaharashtraBhushanAward #AshokSaraf #MarathiCinema #MarathiCulture