Tuesday, May 13, 2025

बारामतीत जाऊन सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार का? राज ठाकरे म्हणाले…

महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वासाठी आपण बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहोत अशी रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी घेतली. त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली असून सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? यावरही वक्तव्य केलं आहे.
मी महायुतीच्या प्रचारासाठी सकारात्मक आहे. मात्र कुठे प्रचारसभा घ्यायची कुठे नाही ते अजून ठरवलेलं नाही. मतदान आलं की मैदानं बुक केली जातात. त्यामुळे सभा होतातच आता त्याबाबत काय करायचं ते पाहू असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क करायचा, कुणाशी बोलायचं? याची यादी दोन दिवसात तयार होईल आणि ती यादी त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल. कुठलाही घोळ व्हायला नको म्हणून ही यादी तयार करण्यात येणार आहे असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles