Saturday, March 2, 2024

पुन्हा बांबू लावला, तर सगळ्यांना बांबू लावेन…टोल नाक्यावर राज ठाकरेंचा रूद्रावतार.. व्हिडिओ

पिंपरी-चिंचवड येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे निघाले होते. यावेळी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे येताना खालापूर टोलनाक्यावर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिवळ्या रेषेच्या बाहेर वाहनांच्या रांग गेल्यास टोल न घेता वाहने सोडली जातात. मात्र, टोलनाक्यावर लांबच्या-लांब वाहनांच्या रांगा पाहून राज ठाकरे संतापले.

राज ठाकरेंनी स्वत: गाडीतून उतरत वाहनांना टोलनाक्यावरून सोडलं. तसेच, रूग्णवाहिकेलाही राज ठाकरे यांनी रस्ता करून दिला आहे. यावेळी ठाकरी शैलीत टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला राज ठाकरे यांनी दम दिला आहे.

“पुन्हा बांबू लावला, तर सगळ्यांना बांबू लावेन मी, एक जरी गाडी अडकली तर याद राखा. कुठपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात माहिती आहे का?” असे खडेबोल राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला सुनावले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles