मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढायची घोषणा केल्यापासून ते महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवरही मुक्तपणे टीका करताना दिसत आहेत. अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली, अशी टिप्पणी राज यांनी केली होती. यानंतर अजितदादा गटाच्या अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते. सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये, असा टोला मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला होता. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेचे नेते गजानन काळे पुढे सरसावले.
70 हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत)
तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय … अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर …??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू …
उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका… पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची
(ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला …
आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!