मोबाईलचा वापर हा केवळ माणसांपूरता मर्यादित राहिला नसून त्याची प्राण्यांना देखील भूरळ पडली आहे.
अशाच एका मोबाईल वेड्या श्वानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. सध्या या श्वानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक श्वान मोबाईलवर कार्टून पाहण्यात दंग झाला आहे. गोल्डन रिट्रीवर प्रजातीचा हा श्वान मऊशार गादीवर आरामत कार्टून पाहण्याचा आनंद लूटतोय. डोळ्याची पापणीही न लवता अगदी मन लावून हा श्वान कार्टून पाहतोय, त्याचा असा अंदाज पाहून नेटकऱ्यांना नवलं वाटतंय.