मोदी सरकारने मोठा डिजिटल स्ट्राइक केला आहे. सरकारने डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आतापर्यंत १.४ लाख मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत. या मोबाईल नंबरचा आर्थिक फसवणुकीत वापर करण्यात आला आहे.आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायबर सुरक्षेवर एक बैठक झाली. या बैठकीत अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एकीकरणासाठी सायबर फसवणूक सूचना, आर्थिक संस्थांच्या विषयांवर चर्चा झाली.डिजिटल सुविधांचा वापर वाढू लागला आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. हॅकर्स आणि स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्याठी नवनवीन पद्धती शोधू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारही सतर्क झाली आहे.
बैठकीत बँक, पोलीस आणि आर्थिक सेवा विभागाचा ताळमेळ ठेवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत १९,७७६ नंबरला ब्लॅक लिस्टला सामावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ५०० हून अधिक कारवाई केल्या आहेत.आजकाल स्कॅमर्स कॉलच्या माध्यमातून डिजिटल फसवणूक करू लागले आहेत. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी ३.०८ लाख सिम ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच ५०००० IMEI नंबर, 2194 यूआरएल ब्लॉक करण्यात आले आहे.