मोहोळ: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला, असे मी कुठेही बोललो नाही. मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलंत, तर मी सार्वजनिक जीवनातून आणि राजकारणातून निवृत्ती घेईन, असं विधान अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलं.
मोहोळ येथे बोलताना अजित पवार म्हणाले, कुत्रे गाडी खाली जाते, तसे त्याला वाटतं तोच गाडी चालवते. कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला, दादाचा दौरा मी रद्द केला. पण अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत त्यांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. पुढं ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौऱ्यावर आल्याने मी मोहोळ दौरा रद्द केला होता, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांच्या टीकेवर बोलतांना पाटील म्हणाले, अजित पवारांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला, असे मी कुठेही बोललो नाही. मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलंत, तर मी सार्वजनिक जीवनातून आणि राजकारणातून निवृत्ती घेईन, असं उमेश पाटील म्हणाले. तसेच आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांनी अजित पवार यांनी चुकीच्या पद्धतीने अजित पवारांचे जाऊन कान भरले. अजित पवारांचा स्वभाव मला त्यांच्यापेक्षा जास्त माहीत आहे, असं पाटील म्हणाले.