Tuesday, February 18, 2025

निलेश लंके प्रतिष्ठानच्या महिलांसाठी मोहटादेवी दर्शन यात्रेस प्रारंभ

खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून गेल्या आठ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या नवरात्र यात्रोत्सवास शुक्रवारी मोठया उत्साहात प्रारंभ झाला. खा. लंके व राणीताई लंके तसेच नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्यानंतर हंगे शिवारातून शेकडो बसेस मोहटादेवीकडे रवाना झाल्या.
शुक्रवारी सकाळी हंगे शिवारात एमआयडीसी लगतच्या मैदानावर सुपा गटातील विविध गावांच्या बसेस एकत्रीत झाल्या. प्रत्येक बसेसमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आल्यानंतर या बसेस मोहटादेवीकडे रवाना झाल्या. दुसऱ्या माळेच औचित्य साधून यात्रेत सहभागी झालेल्या महिलांना हिरव्या रंगाच्या साडया परिधान केल्या होत्या. यात्रेत सहभागी झालेल्या बसेसमध्ये अग्रभागी असलेल्या बसची फुलांनी सजावट करण्यात आली होती. खा. लंके व राणीताई लंके यांनी या बसेसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बसेसचे प्रस्थान झाले.

यावेळी दिपक पवार, विजय पवार, सचिन पवार, सचिन पठारे, बाळासाहेब यादव, सुवर्णा धाडगे, संग्राम इकडे, बंडू साबळे, भाऊसाहेब भोगाडे, दौलत गांगड, डॉ. अजिंक्य गवळी, बबनराव गवळी, विकास म्हस्के, राजेंद्र दळवी, राजेंद्र शिंदे, प्रकाश गुंड, ज्ञानदेव जगताप, जालींदर काळे, पुनमताई मुंगसे, सतिश भालेकर, अमोल यादव, कारभारी पोटघन, संजय तरटे, लकी कळमकर, राजू शेळके, संदीप मगर, दादा शिंदे, दत्ता दिवटे, संदीप वाघमारे, अरूण कळमकर, गोरख उबाळे, कांतीलाल भोसले, संतोष तरटे, दिलीप गुंड, सचिन साठे, सुधीर लाकूडझोडे, विपुल सावंत, संतोष ढवळे, अक्षय थोरात, अमोल पवार यांच्यासह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles