तुम्ही कधीही विचार केला नसेल की, फॅक्टरीमध्ये मोमोज कसे तयार केले जातात? मोठ्या प्रमाणात मोमोज कशा प्रकारे तयार केले जातात याची प्रक्रिया दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रुवातीला एक कामगार पत्ताकोबी, गाजर आणि आले कारताना दिसत आहे. मग या भाज्या कापून आणि त्याचे बारीक तुकडे करण्यासाठी मोठ्या मशीनमध्ये टाकले आहे. आता या भाज्यांना एक ट्रेमध्ये पसरवले जाते आणि मीठ टाकले जाते. हे कोरडे होण्यासाठी बाजूला ठेवले जाते ज्यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते. त्यामुळे उरलेला ओलावा निघून जातो आणि मशीनमध्ये भाज्यां जोरात फिरवले जाते ज्यामुळे उरलेले पाणी देखील निघून जाते.
त्यानंतर पीठ एका मशीनमध्ये मळले जाते. मशीनमध्ये पीठ आणि पाणी टाकून त्याला मळले जाते. तयार पीठाला पुन्हा दुसऱ्या मशीमध्ये टाकून लाटले जाते आणि त्याच्या मोमोजसाठी गोलाकार आकारात कापले जाते. पाणी काढून कोरड्या केलेल्या भाज्या एकत्र केल्या जातात आणि पूर्णपणे कापण्यायासाठी वेगळ्या मशीमध्ये टाकल्या जातात. पीठाची गोलाकार आकाराची पाती घेऊन त्यामध्ये भाज्यांचे सारण भरले जाते आणि पातीला हातानेच मोमोज आकार दिला जातो. तयार मोमोज वाफेवर शिजवले जातात. त्यासाठी मोठ्या भांड्यात तेल लावून ठेवले जातात आणि मग त्याला वाफवले जातात.