आतापर्यंत चहा म्हटलं की केवळ चहापत्ती आणि साखर या दोनच गोष्टी दिसायच्या. पण या मोमोज चहामध्ये तर पार सेजवान चटणी सुद्धा टाकली जात आहे. आधी पाणी, चहापत्ती, साखर आणि दूध यांचं मिश्रण छान उकळवून आपली नेमहीचा चहा तयार केला. अन् मग त्यामध्ये स्टिम मोमोज टाकले, हे मोमोज छान शिजल्यानंतर त्यामध्ये शेजवान चटणी, सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकला. अन् शेवटी जो काही पदार्थ तयार झाला त्याला मोमोज चाय असं म्हटलं जात आहे. ही अनोखी रेसिपी the_ultimate_trolls_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.
- Advertisement -