Sunday, December 8, 2024

Money Mantra पोस्ट ऑफिस आरडीवर आता मिळणार अधिक व्याज

पोस्टाच्या योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप चांगल्या मानल्या जातात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व गुंतवणुकीचे विविध पर्याय तुम्हाला इथे मिळणार आहेत. भागीदाराला हमी परतावा आणि सरकारी हमीसुद्धा मिळेल. म्हणजे पैशांच्या वाढीची हमी तर मिळणार आहे आणि बुडण्याचा धोका राहणार नाही. १ जुलैपासून सरकारने पोस्ट ऑफिस आरडीवरील व्याजातही वाढ केली आहे. आता या योजनेवर ६.५ टक्के दराने व्याज मिळेल, जे आतापर्यंत ६.२ टक्के दराने मिळत होते. पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांपासून आरडी योजना सुरू आहे. तुम्ही यामध्ये १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. नवीन व्‍याजदरामुळे २०००, ३०००, ४००० आणि ५००० रुपयांच्‍या आरडीवर टपाल कार्यालयात किती नफा मिळेल? हे जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही दर महिन्याला २ हजारांची RD सुरू केली, तर एका वर्षात तुम्ही एकूण २४००० रुपयांची गुंतवणूक कराल. ५ वर्षांत एकूण गुंतवणूक १,२०,००० रुपये असेल. यावर ६.५ टक्क्यांनुसार व्याज मोजले तर ५ वर्षांत तुम्हाला २१,९८३ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर १,४१,९८३ रुपये मिळतील.
दुसरीकडे जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा 3 हजार रुपये जमा केले, तर तुम्ही एका वर्षांत ३६००० रुपये आणि ५ वर्षांत १,८०,००० रुपये गुंतवता. ५ वर्षांत ३२,९७२ रुपये व्याज पकडल्यास मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,१२,९७२ रुपये मिळतील.पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा ४ हजार रुपये जमा करून तुम्ही एका वर्षात ४८००० रुपये गुंतवाल. अशा प्रकारे ५ वर्षांत एकूण २,४०,००० रुपयांची गुंतवणूक केली जाईल. ४३,९६८ रुपये व्याज मिळेल. गुंतवलेली रक्कम आणि व्याज पकडून तुम्हाला मॅच्युरिटीवर २,८३,९६८ रुपये मिळतील.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस RD मासिक ५००० रुपयांनी सुरू करत असाल तर तुम्ही वार्षिक ६०००० रुपयांची गुंतवणूक होईल. ५ वर्षांत तुम्ही एकूण ३,००,००० ची गुंतवणूक कराल. ५ वर्षांनंतर तुम्हाला ५४,९५४ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे ५ वर्षांनंतर व्याज जोडल्यास तुम्हाला ३,५४,९५४ रुपये परत मिळतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles