Sunday, December 8, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १७ वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गाने हिरावून घेतलंय. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. याच धामधुमीत शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होणार असं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखांबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली होती. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० हजार अशी वर्षातून तीनदा म्हणजेच ६००० रुपयांची आर्थिक मदत जमा करते.

आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १६ हप्त्यांचे पैसे वर्ग केले आहेत. भारत सरकार लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी करणार आहे. जून महिन्यात पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना खते औषधे आणि बियाण्यांसाठी पैशांची गरज भासते.हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकार लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपयांची आर्थिक मदत जमा करू शकते. मात्र, हे पैसे जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदी अद्याप या योजनेंतर्गत पडताळण्यात आलेल्या नाहीत. त्या शेतकऱ्यांना १७ व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची कमी शक्यता आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज करताना चुकीची माहिती टाकली होती. त्या शेतकऱ्यांना देखील २००० रुपये मिळणार नाहीयेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles