व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की एक मुलगा आपल्या पायाने झाडाला स्पर्श करताच झाडांतून नोटांचा पाऊस पडताना दिसत आहे. हा तरुण लागलीच त्याच्या डोक्यावर पडणाऱ्या या नोटांना जमा करताना व्हिडीओ दिसत आहे. या तरुणाच्या हालचाली रस्त्यावरील इतर पादचारी देखील पाहात आहेत. त्यानंतर हा तरुण पुन्हा झाडाला किक मारतो आणि पुन्हा झाडावरुन नोटांचा पाऊस पडताना दिसत आहे. पुन्हा या पडलेल्या नोटा तरुण गोळा करताना दिसत आहे. त्यानंतर या नोटा खिशात ठेवून झाडाचे आभार मानत हा तरुण येथून निघून जाताना दिसत आहे.
झाडाला लाथ मारून नोटांचा पाऊस सुरु असल्याचे आक्रीत दुरुन एक तरुण मुलगा पाहताना व्हिडीओत दिसत आहे. त्यालाही असे पैसे पडत असताना पाहून मनात पैशांची लालसा तयार होते. आणि पहिला तरुण गेल्यानंतर हा तरुण आपले नशिब आजमविण्यासाठी या झाडा जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्याने पहिल्या तरुणा प्रमाणे झाडाला हात लावून हलविले. आणि पैशांचा पाऊस पडण्याची तो वाट पाहू लागला तर अचानक झाडावरुन कोणीतरी बादलीने पाणी ओतल्याचे व्हिडीओत दिसत आहे.