मोये-मोये हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे. गाण्याचा अर्थ म्हणजे वाईट स्वप्न किंवा वाईट घटना अशी आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीसोबत काही असं घडलं तर तो मोये-मोये क्षण म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होतो. या तरुणीसोबतही माकडानं असंच केलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणीच्या हातात बिस्कीटचा पुडा आहे. तर बाजूला एका कठड्यावर ४, ५ माकडं बसली आहेत. एरवी माकडं कुणाच्या हातात काय दिसलं की त्यावर झडप घालून पळवून नेतात. मात्र ही माकडं असं काहीच करत नाहीयेत. ही तरुणी या माकडांना एक एक बिस्किट काढून देते त्यावर ते माकड बिस्कीट घेतं मात्र त्याचा वास घेून ते फेकून देत आहे. बरं एका माकडानं नाही खाल्ले म्हणून तरुणीने दुसऱ्या माकडाला बिस्कीट दिलं. तर त्यानेही बिस्कीटाचा वास घेऊन ते टाकून दिलं. तिसऱ्यानं तर बिस्किटला हात देखील लावला नाही. हे पाहून तरुणीला हसू का रडू असं झालं आहे.
Vidoe माकडांमुळे तरूणीची अशी अवस्था…म्हणावे लागेल ‘मोये मोये’..
- Advertisement -