Tuesday, May 28, 2024

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस…मान्सून आगमनाची हवामान विभागाने तारीखच सांगितली

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनविषयी महत्त्वाची अपडेट दिलीय. यावर्षी देशभरात वरुण राजा धो-धो कोसळेल, असा होण्याचा अंदाज हवामन विभागाने वर्तवलाय. यावर्षी ८ जूनपर्यंत मान्सून येणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळा असणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी दिलीय.

सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी आशादायी असून सध्याची परिस्थिती मान्सूनच्यादृष्टीने चांगली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्यादृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी वर्तवलीय. यंदा जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा राहणार असून या काळात ८७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात ५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १०४-१०६ टक्के वरुण राजा बरसणार आहे.भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज मे महिन्यात वर्तवला जाणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles