नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सून यंदा चांगलाच बरसला. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आता मान्सून आपला परतीचा प्रवास सुरु करणार आहे. त्यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सून १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास सुरु करण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाने सांगितले की, वायव्य भारताच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी वारे परत फिरण्यासाठी पुढील आठवड्यात अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. सध्या सक्रिय असलेल्या ला-निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली गेली.
- Advertisement -