मोरिंगा अर्थात शेवग्याची शेंग ही एक वनस्पती आहे ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारताच्या दक्षिणेकडील भागात याचा वापर जास्त केला जातो. ह्या वनस्पतीची पाने, फुले आणि मुळे खाता येतात आणि त्यांचे सर्व भाग अँटिऑक्सिडंट्स व्यतिरिक्त पोषणाने समृद्ध आहेत. हे फुफ्फुस, हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाच्या ऊतींचे संरक्षण करते. त्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या महिला रोज मोरिंगा पावडरचे सेवन करतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मोरिंगा प्लांटचे कौतुक केले. पंतप्रधान सुद्धा मोरिंगा पराठा खातात आणि त्यांना तो खूप आवडतो. मोरिंगा पावडर हे पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले सुपरफूड आहे. त्यात आयरन, कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फोरस, मॅग्नेशियम आणि विटामिन ए, बी, सी, आणि के यांसारखे आवश्यक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय त्यात झिंक आणि विविध अँटीऑक्सीडंट्स असतात जे आपल्या शरीराच्या इम्युनिटीला वाढवतात. मोरिंगा हे केवळ पोषणमूल्यांनी समृद्ध नसून त्यात औषधी गुणधर्मही आहेत. ते नियमितपणे घेतल्यास शरीराचे आरोग्य सुधारते आणि विशेषतः शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते.
अनेक आरोग्यदायी फायदे या भाजीची पावडर…नरेंद्र मोदींचे सुद्धा आहे फेव्हरेट
- Advertisement -