Tuesday, April 29, 2025

सातबाऱ्यावर लागणार आईचं नाव; राज्य सरकारच्या निर्णयाची ‘या’ तारखेपासून अंमलबजावणी

राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. विविध कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश केल्यानंतर आता अर्जदाराच्या सातबाऱ्यावर देखील आईचं नाव लागणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन किंवा एखादी सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावात आता आईच्या नावाचा उल्लेख होणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत याबाबत संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आईच्या नावासाठी सातबाऱ्यात नवा कॉलम तयार केला जात आहे. त्यामुळे पुढील ६ महिन्यांत याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. आईचे नाव लावण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत. आई असल्याचा पुरावा दिल्यानंतरच आईचे नाव लावता येणार आहे. तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल.

विवाहाच्या आधीच्या नावानेही होईल नोंदणी

सध्या महिलांची नावे लावताना महिलेचे स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि अडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असणार आहे.

अभिलेख विभागामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयात १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावामागे आईचं नाव लावलं जाणार आहे. तसेच या तारखेआधी जन्मलेल्या व्यक्तींना आपल्या आईचे नाव सातबाऱ्यावर लावायचे असल्यास ते देखील नाव लावू शकतात. फक्त त्यासाठी आपल्या आईची ओळख पटवून देणारा पुरावा त्या व्यक्तीला जमा करावा लागणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles