Monday, March 4, 2024

Moto G24 Power… जबरदस्त फिचर्स, किंमतही अतिशय आवाक्यात…

Moto G24 Power

मोटोरोलानं भारतीय बाजारपेठेत आणखी एक स्वस्त मोबाईल सादर केला आहे. कंपनीनं शक्तिशाली फीचर्ससह मात्र ८,९९९ रुपयांमध्ये Moto G24 Power आणला आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, ब्रँडच्या वेबसाइटसह अन्य रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होईल. यात ६०००एमएएचची बॅटरी, ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ६.६ इंचाचा मोठा डिस्प्ले, आयपी५२ रेटिंग सारखे फीचर्स मिळतात.

नवीन G24 Power स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आणला आहे. डिवाइसच्या ४जीबी रॅम व १२८जीबी व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे तर ८जीबी रॅम व १२८जीबी मॉडेल ९,९९९ रुपयांचा आहे. हा मोबाइल ग्लेशियर ब्लू आणि इंक ब्लू अश्या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles