व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की उंदीर पकडण्यासाठी एक अनोखं यंत्र बनविले दिसत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, दोन प्लास्टिकच्या बाटल्या घेतल्या आहेत आणि या बाटलीत धान्य टाकले आहेत. बाटलीच्या तोंडावर मोठ्या आकाराचे प्लास्टिकचे पाइप्स लावलेले आहेत.
तुम्हाला व्हिडीओत दिसेल की बाटलीतील धान्य खाण्यासाठी उंदीर जमलेले आहेत. धान्य खाण्यासाठी हे उंदीर पाइपमध्ये शिरतात आणि थेट बाटलीत पडतात. एका मागून एक असे चार पाच उंदीर बाटलीत पडतात. उंदीर पकडण्याचा हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हिडिओ… छोटीशी ट्रिक आणि घरातील उंदरांचा उपद्रव होईल बंद…
- Advertisement -