सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात लग्नातील अनेक व्हिडिओ असतात. लग्नातील डान्सचे, गाण्याचे व्हिडिओ असतात. अनेकदा तर लग्नात मित्रमंडळी प्रँक करतात. असाच एक लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या मोये मोये हा ट्रेंड व्हायरल होत आहे. एखाद्याची फजिती झाल्यावर हे गाणे वाजवले जाते. हाच ट्रेंड एका लग्नात नवऱ्याच्या मित्रांनी केला आहे अनेकदा लग्नात नवरदेवाचे मित्रमंडळी काहीतरी प्रँक करतात. मध्यंतरी लग्नाच्या आहेरात झाडू, बादली अशा सर्व वस्तू द्यायचा ट्रँड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता लग्नात मोये मोयेचा ट्रेंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत लग्नसोहळा सुरू आहे. लग्नात मंगलाष्टका सुरु असतात. नवरा- नवरी एकमेकांना हार घालतच असतात. तेच एका बाजूने नवऱ्याचे मित्र मोठ्याने मोये मोये ओरडतात. त्यावेळी नवरा हळूच गालात हसतो. तर नंतर मस्करी केल्याने नवरी एकदम रागात लूक देते. याचाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्न केल्यामुळे नवरा अडकला असल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे असावे. त्यामुळेच त्यांनी मोये मोये म्हटलं असावं.