Monday, July 22, 2024

लोकसभेत शपथ घेताना ओवेसी म्हणाले, ‘जय पॅलेस्टाईन’ संसदेत गदारोळ व्हिडिओ

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेताना ओवेसींनी ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत.

प्रोटेम स्पीकरने असासुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. यानंतर ओवेसी आले आणि खासदार म्हणून शपथ घेतली. खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. त्यांनी हा नारा दिल्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला.
https://x.com/asadowaisi/status/1805543856664199175?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1805543856664199175%7Ctwgr%5E7c3f051ff1560f0f3b3e80fee3744cd0ed6d1bd0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fasaduddin-owaisi-says-jai-palestine-while-taking-oath-as-lok-sabha-mp-sbk90
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या उमेदवार माधवी लता यांचा 3,38087 मतांनी पराभव केला. आधी 2019 च्या निवडणुकीत ओवेसी यांनी एकूण 58.95 टक्के मतांसह विजय मिळवला होता.

दरम्यान, लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारी (२४ जून) सुरू झाले/ ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारच्या मंत्रीपरिषदेचे सदस्य, तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles