Wednesday, April 17, 2024

भाजपाला धक्का लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपा खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सध्या देशात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेते पक्षांतर करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. काही नेते काँग्रेसमधून भाजपात तर काही भाजपामधून इतर पक्षात जात आहेत. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हरियाणामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

हरियाणाच्या हिसारचे भाजपा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपा खासदार ठोकला आहे. काही राजकीय कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ब्रिजेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ब्रिजेंद्र सिंह यांनी राजीनामा दिल्यामुळे हिसारमध्ये भाजपाला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच खिंडार पडलं आहे. भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन ब्रिजेंद्र सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी काही वेळ चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ब्रिजेंद्र सिंह यांना भाजपाकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केल्याची चर्चा आहे. तर ब्रिजेंद्र सिंहांना आता काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles