ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांच्याआधी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना ॲाफर होती, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच पाटील यांनी नकार दर्शविल्यामुळेच दानवेंची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली असल्याचे खैरे यांनी सांगितले. खैरेंच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.