रावसाहेब शेळके पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. दादा पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रावसाहेब शेळके पाटील यांनी रविवारी (दि.24 सप्टेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप मध्ये प्रवेश केला.
पोखर्डी (ता. नगर) येथे भाजपच्या पदाधिकारी संवाद कार्यक्रमात शेळके यांचा जाहीर प्रवेश झाला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, बबनराव पाचपुते आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसमय घराणे म्हणून ओळख असलेल्या शेळके कुटुंबीय भाजपवासी झाल्याने तालुक्यात महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वीच रावसाहेब शेळके यांचा मुलगा शेळके याने भाजप मध्ये प्रवेश केला होता. आता पित्रा-पुत्र दोन्हींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेळके कुटुंबीयांची देहरे गटासह नगर तालुक्यात चांगली पकड असून, याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रावसाहेब शेळके पाटील यांचे भाजपमध्ये स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्व. दादा पाटील शेळके यांचे पुत्र रावसाहेब शेळके यांचा भाजप मध्ये प्रवेश
- Advertisement -