काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याचे वृत्त टिव्ही ९ मराठीने दिले आहे. राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना कोल्हे यांनी, त्यांच्याच सहयोगी पक्षांबाबत हे भाष्य केल्याचं समजतं.
राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही.
– काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही.
– आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत.”
– सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे.