राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर असलेले नगरमधील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण जगताप यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर खा. डॉ सुजय विखे यांनी दिली आहे.
नगरमध्ये शब्दगंध साहित्य परिषद आणि महापालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा भाजपचे खासदार विखे पाटील आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.
खासदार विखे म्हणाले, “नगर जिल्ह्याच्या उत्तरेत साहित्य चळवळ गेली अनेक वर्षे सक्रिय आहे. दक्षिणेत मात्र, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यानंतर आमदार संग्राम जगताप साहित्य चळवळीला पाठबळ देताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात जगताप ही चळवळ पुढे नेतील, अशी साहित्यिकांची अपेक्षा आहे.” जगताप यांनी अचानक साहित्याकडे वळणे हा महायुतीचाच परिणाम असून, अरुणकाका तुम्ही भाजपमध्ये या, असे विखे यांनी म्हणताच उपस्थितांनी भुवया उंचावल्या.
अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. विधानपरिषदेवर ते दोन टर्म आमदार होते.