साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. चुका आपल्या असतील तर ऐकून घेऊन त्या दुरुस्त करणही आपलंच काम आहे. मात्र, विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. म्हणूनच पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्टा करणारे आमदार अमोल मिटकरी ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर मी जाणार नाही अशी ठोस भूमिका भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडली. त्याचवेळी त्यांनी आमदार जितेंद्रर आव्हाड यांच्यावरही टीका केली. त्या सांगली येथे एका आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या. दरम्यान, अमोल मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते, त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर मिटकरी त्या सभेला आलेच नाही अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
खासदार कुलकर्णी म्हणाल्या, मी इथे सत्कार घ्यायला आले नाही तर जिथे आपल्याला त्रास होत असेल तेथे ब्राम्हण समाजाने व्यक्त झालं पाहिजे, हे सांगायला आले आहे. आपल्याबद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळी टीका होते. आपल्याबद्दल नकारात्मकतेची मोठी भावना असते. ती नकारात्मकता आपल्या वर्तणुकीतून नाहीशी करण्याचा प्रयत्न करणं हे आपले काम आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन देशाला पुढे न्यायचं आहे.असंही त्या म्हणाल्या आहेत.