Sunday, July 21, 2024

खासदार निलेश लंके अपात्र..? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला

अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या भोंगळ कारभारामुळे असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष खा. नीलेश लंकेंसह दोघांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन निवडणुकीत मतदानाच्या अधिकारासाठी जिल्ह्यातील चार जणांची नावे कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी यांनी पाठविले होते.

मात्र, खा. लंकेंसह दोघांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला आहे. दरम्यान, सेक्रेटरीच्या आडमुठेपणामुळे खा. लंके यांना फटका बसला असून, त्यांना आता मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या निवडणुकीत नगर जिल्हा कार्यकारिणीतील चार जणांना मतदानाचा अधिकार आहे. जिल्हा सेक्रेटरी यांनी जिल्हा कार्यकारिणीतील खा. नीलेश लंके, सच्चिदानंद भोसले, सुधाकर सुंबे आणि महिलांमधून भारती पवार या चार जणांची नावे असोसिएशनकडे मताअधिकार मिळविण्यासाठी पाठविले होते. पीटीआर उतारा नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खा.लंकेंसह भोसले यांचे अर्ज बाद केले.

सेक्रेटरी यांनी कागदपत्रांची नीटनेटकी पूर्तता केली केली नाही नाही तसेच पीटीआर मतदानाचा उतारा जोडला नसल्याने ही वेळ आली आहे.सेक्रेटरी यांनी खा. लंके यांना अंधारात ठेवल्याचे बोलले जाते. भोसले हे लातूरचे आहेत त्यांचे नाव नगर जिल्ह्यातून कसे आले?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, सेक्रेटरी यांनी भोसले यांचे नाव न देता स्वतःचे नाच का दिले नाही? याचे गौडबंगाल काय आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. भोसलेचे नाव दिल्याने कबड्डीपटू देखिल चांगलेच संतप्त झाले आहेत.

जिल्ह्याचा राज्यात कबड्डीमध्ये दबदबा असताना सेक्रेटरी यांनी जिल्ह्याच्या बाहेर असलेले भोसले यांचे नाव, असोसिएशनकडे का पाठविले, त्यामागे नेमके कोणते कारण आहे याचा खुलासा तसेच खा. लंके यांचा अर्ज बाद का झाला, याचा खुलासा करावा, अशी मागणी कबड्डीच्या खेळाडूंची आहे.

जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन कार्यकारिणीतील चार जणांच्या नावाचा ठराव करत ते फायनल केली का? यात शंका आहे. या बैठकीत कोणाची नावे होती तसेच खा. लंके यांना याबाबत माहिती होती का? याचा खुलासा सेक्रेटरी यांनी करावा. जिल्ह्यात कबड्डी खेळाडू लायक नाही म्हणून सचिव यांनी जिल्ह्याबाहेरील भोसले यांचे नाव राज्याकडे पाठविले.

जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंनी कबड्डीचा वारसा पुढे चालविला आहे, असे असताना भोसले यांना पुढे का केले, याचे उत्तर आता त्यांना द्यावे लागणार आहे. भोसले यांचा अर्ज बाद झाल्याने खा. लंके यांचा अर्ज बाद बाद झाल्याची चर्चा आहे. भोसले यांचे नाच नसते खा. लंके यांचा अर्ज बाद झाला नसता, अशी देखील चर्चा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles